Skip to content
Home » लोकं माझ्याविषयी चुकीचंच बोलतात…अशा वेळी काय कराल??

लोकं माझ्याविषयी चुकीचंच बोलतात…अशा वेळी काय कराल??

लोकं माझ्याविषयी चुकीचंच बोलतात…अशा वेळी काय कराल??


मिनल वरपे


साहिल नुकताच एका नवीन कंपनी मधे जॉईन झाला होता. सुरवातीचे काही दिवस नविन सगळं असल्यामुळे कोणाचा स्वभाव, कोण काय बोलतेय याकडे त्याच अजिबात लक्ष नव्हतं.. त्याच पूर्ण लक्ष त्याच्या कामात होत कारण नवीन जॉब आहे एकही चूक होता कामा नये नाहीतर परिणाम जॉब वर होतील.

पण काही दिवसांनी त्याच काम त्याला अगदी सहज जमायला लागलं आणि हे लक्ष तो कामावर द्यायचा तेच तो आता आजूबाजूला कोण काय बोलतेय याकडे द्यायला लागला. आणि मग साहजिकच आहे कोण चांगलं बोलते तर कोणी वाईट.. कोणी आपली स्तुती करतेय तर कोणी आपल्याबद्दल उगाच काहीतरी चुकीचं बोलताहेत.हे त्याला कळायला लागलं.

नंतर जे चांगल बोलत आहेत तेच आपल्यासाठी जवळचे आणि जे आपल्याबद्दल वाईट बोलत आहेत ते आपले विरोधक असा विचार करून साहिल सतत विरोधक जे आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करू लागला.

सतत ते आपल्याबद्दल काय बोलतात, काय बोलत असतील, काय विचार करत असतील याकडे त्याच पूर्ण लक्ष वेधलं जातं होत. आणि यामुळे त्याच त्याच्या कामाकडे कमी आणि नको असलेल्या ठिकाणी जास्त वेळ जाऊ लागला.

परिणामी त्याचा पूर्ण परिणाम साहिलच्या कामावर होऊ लागला शिवाय त्याच्या विचारांवर. आपण काय करत आहोत, आपली ध्येय काय, आपण आपला वेळ नक्की कुठे वाया घालवत आहोत याकडे त्याच दुर्लक्ष झालं.

आत्मविश्वास कमी होतो

आत्मविश्वास हा केव्हा वाढतो जेव्हा आपण जे काही करतोय त्यामधे आपलं पूर्ण लक्ष असेल.. जरी एकदा चूक झाली तरी पुन्हा ती घडू नये म्हणून आपण त्यामधे सुधारणा करतो आणि अजून चांगल्या प्रकारे काम करतो पण जेव्हा आपलं लक्ष भलतीकडे जाते तेव्हा आपल्या चुका वाढतात आणि आत्मविश्वास कमी होतो.

भीती वाढणे

आपण एखादी चूक केली आणि आपल्यातील आत्मविश्वास कमी असेल तर अशावेळी ती चूक पुन्हा झाली तर काय करायचं.. आणि अशा चुका वाढत गेल्या तर अशावेळी त्याचा आपल्या नोकरीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन मनातील त्या कामाची भीती वाढते.

एकाग्रता कमी होते

मी काय करत आहे.. काय केलं पाहिजे.. मी जे करतोय ते योग्य की अयोग्य हे ठरवणारे आजूबाजूचे आहेत असा जेव्हा आपण विचार करतो आणि त्यांच्या चर्चेला आपण महत्त्व देतो अशावेळी माझ्याबददल कोण काय बोलत आहे इथेच आपण लक्ष देतो आणि आपल्या कामावर ज्या एकाग्रतेची गरज आहे ती कमी होते कारण आपलं लक्ष कधी कामात तर कधी चर्चे कडे अस आपलं मन आणि डोक अस्थिर असते.

नोकरी जाण्याची शक्यता

जिथे आपण आपल कामच योग्य प्रकारे करत नाही. कामात आपल लक्ष कमी उरलेलं असते.. आपल्या चुका या वाढलेल्या असतात… तिथे आपली नोकरी टिकून राहण्याची शक्यताच उरत नाही.

आपल्या स्टेटसवर होणारे परिणाम

आपण नकोत्या चर्चेला महत्त्व देतो पण अशामुळे आपलं कामावर लक्ष राहत नाही.. आपल्याला आपल्या वरिष्ठांची बोलणी ऐकावी लागते. आपण जस काम आधी करत होतो, आपल्याकडून चुका होत नव्हत्या, आपल आपल्या कामात लक्ष असल्यामुळे आपल्याला कधी ओरडा खाण्याची वेळ येत नव्हती आणि हे आपलं स्टेटस आपल्या भरकटलेल्या वागण्यामुळे बदलते.

म्हणून जर आपल्या अशा वागण्याचे परिणाम असे भयंकर होऊ शकतात तर आपण जास्तीत जास्त कस चांगलं काम करू शकतो यावर लक्ष द्यावं. आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं तर आपल्या बद्दल कोण चांगलं बोलत आहे आणि कोण वाईट याकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळ सुद्धा मिळत नाही.

आपलं काम हे नेहमीच असल्यामुळे सवयीप्रमाणे आपण ते सहज करतो आणि आपल्याला पुष्कळ वेळ मिळतो मग हा वेळ आपण कुठे आणि कसा घालवायचा याचं आपल्याला योग्य व्यवस्थापन करता आले पाहिजे.

मिळालेल्या वेळेत नवीन काय करता येईल यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले तर आपल्याला कामात अजून आनंद मिळेल.आपल्या कामात नाविन्यता आणता येईल. नवनवीन पद्धतीने काम केलं, नेहमी नवीन काही शिकण्याचा प्रयत्न केला की आपल्या मेंदूला आणि परिणामतः आपल्याला नवीन ऊर्जा मिळेल.. वेगळा उत्साह मिळेल.

आणि आपल्याला मिळालेल्या नवीन ऊर्जेचा नवीन उत्साहाचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

error: Content is protected !!