Healthy मानसशास्त्र संकेस्थळावर तुमचे मनापासून स्वागत!!

नमस्कार,

‘आपलं मानसशास्त्र’ या मानसशास्त्रीय प्लॅटफॉर्मला तुम्ही सर्व चाहत्यांनी दिलेल्या घवघवीत प्रतिसादानंतर ‘Healthy मानसशास्त्र’ ही नवीन संकल्पना पुढे आणण्याची कल्पना सुचली. आत्तापर्यंत ‘आपलं मानसशास्त्र’ मार्फत अनेक लेख आपण प्रकाशित केलेत. तसेच यापुढेही कायमस्वरूपी करत राहूच.

पण मग ‘Healthy मानसशास्त्र’ ही संकल्पना कशासाठी ??

या प्रश्नाचं विशेष असं काही उत्तर नाही. पण तरीही अशा पुष्कळ गोष्टीत अजूनही आहेत ज्या आम्हाला ‘आपलं मानसशास्त्र’ या प्लॅटफॉर्मवरून देताना अनेक मर्यादा यायच्या. अजूनही येत आहे.

एखाद्या प्लॅटफॉर्मची एक विशिष्ट अशी क्षमता असते. त्या क्षमतेबाहेर जर अशी एखादी गोष्ट पसरत असेल तर आत्तापर्यंत निर्माण केलेल्या पूर्ण त्या प्लॅटफॉर्मवर त्याचा बोझा होतो. ज्याचा परिणाम मूलभूत गोष्टींवर प्रकर्षाने होतो.

हा मुद्धा लक्षात घेऊन एका वेगळ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्याची कल्पना सुचली आणि आज ती अमलात आणत आहोत.

‘आपलं मानसशास्त्र’ ची ज्यावेळी आपण सुरुवात केली होती. तेव्हा तमाम वाचकांना आणि लेखकांना आपण स्व-लिखाण करण्यासाठी आवाहन केले होते. त्यावेळी जसा तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला, तुमचे स्वलिखित लिखाण पाठवले, अगदी तीच गोष्ट लक्षात ठेऊन याही आवाहनाला तुम्ही प्रतिसाद द्याल, अशी आम्ही आशा बाळगतो.

जेणेकरून जास्तीत जास्त वाचकांपर्यंत तुमचे लिखाण आम्हाला पोहोचवता येतील. हे स्व-लिखाण कसे असावे याबाबत आपण विस्तृत लेख लिहिलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली मिळेल.

ज्या स्व-लिखाण करणाऱ्या सामान्य व्यक्ती आपल्यासोबत आजही जुडलेले आहेत, त्यांना आपण एक ठराविक पेमेंट सुद्धा सुरु केले आहे. जवळजवळ लाखो वाचकांपर्यंत हे लिखाण सहज जाऊ शकते, अशी भक्कम यंत्रणा आपण उभी केली आहे.

तुम्ही पाठवत असलेले लिखाण याआधी कोणत्याही सोशल मिडीयावर तुम्ही पोस्ट केलेले नसावे. ही मुख्य अट आहे. कृपया उत्सुकांनी याची नोंद घ्यावी. हे स्व-लिखाण तुम्हाला खालील ई-आयडी वर मेल करायचे आहे.

majhe.lekh@gmail.com

तसेच लिखाण नेमके कसे असावे, कोणता विषय असावा.. यासाठी खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही लेख वाचू शकता.

क्लिक करा

Healthy मानसशास्त्र – Facebook Page आणि Facebook Group

आपलं मानसशास्त्र सोबतच आता Healthy मानसशास्त्र हे नवीन प्लॅटफॉर्म आपल्या सेवेसाठी उपलब्ध होत आहे. धन्यवाद!

 

आपला नम्र,

श्री. राकेश वरपे (मानसशास्त्र तज्ज्ञ)

संस्थापक – आपलं मानसशास्त्र, Healthy मानसशास्त्र

3 Replies to “Healthy मानसशास्त्र संकेस्थळावर तुमचे मनापासून स्वागत!!

  1. I would like to join this group because healthy psychology is most important for this time to everyone.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *