Skip to content
Home » स्वतःवर पूर्ण विश्वास असेल तर कोणतेही प्रसंग जिंकता येतात.

स्वतःवर पूर्ण विश्वास असेल तर कोणतेही प्रसंग जिंकता येतात.

स्वतःवर पूर्ण विश्वास असेल तर कोणतेही प्रसंग जिंकता येतात.


मिनल वरपे


तिने तिचं संपूर्ण आयुष्याचा निर्णय एका क्षणात घेतला याच कारण अगदीच छोट कोणाला पटणार सुद्धा नाही.. पण हेच आजच सत्य आहे…

प्रेरणा ही आजच्या पिढीतली मुलगी.. अभ्यासात लहानपणासूनच खूप हुशार.. शिक्षण , पुढचं करिअर या सगळ्याच तिने उत्तम नियोजन अगदी आधीच केलं होत म्हणतात ना आपल्याला आपलं ध्येय माहीत असेल तर ते पूर्ण करण्यासाठी मार्ग मिळायला सोप जाते.अगदी हाच स्वभाव प्रेरणाचा होता..

तिला निवडक मैत्रिणी होत्या अगदी जवळच्या .. ती अगदी सहज कोणाशी जुळवून घेणारी होती फक्त जास्त जवळीक न साधता योग्य ते अंतर राखून वागायची म्हणून तिच्या नियोजनावर कसले परिणाम होत नव्हते. आपण किती बोलायचं, कस वागायचं, कुठे जायचं, कधी काय करायचं हे तिला चांगलच माहीत होत.

शिक्षण पूर्ण झालं.. तिच्या शिक्षणानुसर तीला उत्तम नोकरी सुद्धा मिळाली. तिच्या घरचे सुद्धा तिच्याबाबतीत निच्छिंत असायचे. पण कोणाला माहीत सगळं एकदम सुरळीत होत असताना सुद्धा अस अचानक काही घडेल…

प्रेरणा काही दिवस एकदम शांत शांत राहायची तिला काय झालं असेल असा घरच्यांना प्रश्न पडलेला पण काहीनाही दिवसभर कामाची गडबड म्हणून थकवा जाणवतोय बस बाकी काहीच नाही..
अस म्हणत ती उत्तर द्यायला टाळायची. मग घरच्यांना सुद्धा वाटायचं की असेल थकवा.त्यामुळे ते जास्त विचार नव्हते करत.

पण प्रेरणाच्या मनात मात्र दुसरेच विचार, दुसरेच प्रश्न गोंधळ करत होते. ती जिथे काम करत होती त्या ठिकाणी तिच्या जोडीला काम करणारे तिच्याबद्दल सतत काहीना काही कुजबुज करायचे.. खर तर तीच काम खूप चांगल होत म्हणून तिचे ऑफिसर तिच्यावर खुश असायचे.. ते तीच नेहमीच कौतुक करायचे.. कोणी चूक केली की तीच त्यांना उदाहरण द्यायचे ..पण या सगळ्याचा काही जणं चुकिचा अर्थ लावायचे आणि तिच्याबद्दल नकोत्या अफवा पसरवत होते.

त्यांची होणारी चर्चा सतत तिच्या कानावर पडायची. आणि त्यामुळे तीच कामात लक्ष लागत नव्हत.. कामात लक्ष लागत नाही म्हणून चुका होतील आणि माझी नोकरी जाईल ही भिती तिच्या वाढत गेली, तसेच होणारी चर्चा जर अजून पसरत गेली तर माझी चूक नसताना माझं चांगल वागणं असूनसुद्धा सर्वांमध्ये माझी चुकीची प्रतिमा निर्माण होईल.. आणि या सगळ्याचा परिणाम माझ्या नोकरीवर होईल जर ही नोकरी मला सोडावी लागली तर मिळणाऱ्या पुन्हा मला नविन नोकरी कोणी देणार नाही कारण नविन ठिकाणी जुनी नोकरी सोडण्याचं कारण विचारलं तर ते सुद्धा माझ्या आचरणावर शंका घेतील.

माझ्या घरी हे सगळं कळलं तर त्यांना काय वाटेल. जरी त्यांचा माझ्यावर विश्वास असला तरी माझ्या होणाऱ्या बदनामीचा त्यांना किती त्रास होईल.. माझ्या लग्नाचं टेन्शन अजून वाढेल..माझ्या भावा बहिणींच्या शिक्षणावर याचे परिणाम होतील…

या सगळ्या प्रश्नांनी प्रेरणा भंडावून गेली होती. ती तिच्या मनातील प्रश्न, घडणाऱ्या गोष्टी कोणालाच सांगत नव्हती आणि एकटीच त्याचा विचार करत करत शेवटी तिने आत्महत्येचा निर्णय घेतला…

तिने जीव देण्याचा प्रयत्न केला पण तिच्या विचारांनी जरी या तिच्या निर्णयाला पाठिंबा दिलं तरी तिच्या कृतींनी मात्र तिची साथ दिली नाही. आज ती वाचली पण …पण तिने केलेल्या या भयानक प्रकारचा धक्का तिच्या घरच्यांना बसला.

नंतर सर्वांनी तिला खूप चांगल्या पद्धतीने समजावलं आणि यातून तिला बाहेर काढून तिने चांगल आयुष्य जगावं यासाठी साथ दिली.

आज प्रेरणा तर वाचली पण असे अनेक माणस आहेत.. प्रगती सारख्या मुली आहेत..आजची तरुणाई आहे.. ज्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली की ते कमजोर पडतात आणि नकोत्या होणाऱ्या अफवांचा आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करून मिळालेलं आयुष्य आणखीन सुंदर करण्यापेक्षा तेच आयुष्य क्षणात संपवण्याचा निर्णय घेतात.

आपल्याबद्दल वाईट बोलणारे जर असतील तर आपल्याला साथ देणारे सुद्धा असतातच. पण त्या आधी आपण आपली साथ देणं गरजेचं आहे.

म्हणून आपल्याबद्दल कोण काय बोलते यापेक्षा आपण काय करतोय याकडे आपण लक्ष द्यावं.. माझं वागणं मला माहित आहे आणि माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे हे जर मनाशी ठाम असेल तर आपल्यासमोर उभे राहिलेले प्रसंग कितीही वाईट असले तरी त्याचा आपल्या विचारांवर आणि निर्णयांवर परिणाम होणार नाही…तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

error: Content is protected !!