Skip to content
Home » मनाला स्ट्रॉंग करण्याच्या या ५ टिप्स वाचूया..

मनाला स्ट्रॉंग करण्याच्या या ५ टिप्स वाचूया..

मनाला स्ट्रॉंग करण्याच्या या ५ टिप्स वाचूया..


श्री. राकेश वरपे I ९१७५४२९००६

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संस्थापक, Healthy मानसशास्त्र


ज्या व्यक्तीकडे जगण्याची आशा आहे, ती व्यक्ती क्षुल्लक दुःखांमध्ये स्वतःला फार काळ अडकवून ठेवत नाही, असं आपण पुष्कळदा ऐकून आहोत. परंतु तरीही तशा व्यक्तीप्रमाणे आपल्याला राहता येत नाही. निश्चित अशा टिप्स माहिती नसल्यामुळे आपल्याला केवळ ते विचार स्पर्श करून जातात.

आजच्या या लेखात काही टिप्सचा आपण विचार करणार आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यात निरनिराळ्या तऱ्हेचे प्रसंग घडत असतात. तसेच काही वेळेस चार पैकी दोन व्यक्तींच्या आयुष्यात एकसारखेच प्रसंग सुद्धा घडतात. परंतु इथे सुद्धा आपण एकमेकांपासून वेगळे असल्यामुळे प्रत्येक प्रसंगाकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.

स्वभाव, व्यक्तिमत्व, विचार, भावना, वर्तन, निर्णय घेण्याची पद्धत यामध्ये व्यक्तिभिन्नता असल्याने एखाद्यासाठी तो प्रसंग अत्यंत सरळ असतो तर एखाद्यासाठी तो मात्र खूपच अवघड असतो.

हि व्यक्तिभिन्नता शेवटपर्यंत राहणार आणि ती आहे म्हणूनच आपण एकमेकांचा आदर आणि सन्मान करतोय. त्यामुळे एका सामान पातळीवर सर्वांना लागू होतील अशा स्ट्रॉंग मनाच्या टिप्सची निवड करणे अवघडच. चला पाहूया..

१) व्यक्तिभिन्नता

आपण सर्वचजण एकमेकांपासून वेगळे आहोत आपल्या मनाची, बुद्धिमत्तेची आणि मेंदूची रचना यांमध्ये सुद्धा फारकत आहे, हे आधी आपण ओळखून स्वीकारलं पाहिजे. त्यातूनच पुढे मग मानसिक विकास होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. आपले भिन्न व्यक्तिमत्व हे आपल्याला इतरांपासून कायम वेगळे ठेवते.

म्हणून गर्दीपेक्षा वेगळं बनायचं असेल किंवा आखून दिलेल्या चौकटींमध्येच राहायचं नसेल तर आधी व्यक्तिभिन्नतेचा सखोल अभ्यास असायला हवा.

२) व्यक्तिसापेक्षता

काही बाबी या तुमच्या-आमच्या आणि अखंड मानवजातीसाठी या नेहमी वस्तुनिष्ठ राहणार आहेत. त्या ठिकाणी वेगळं काहीतरी करून वेळ आणि मानसिक ऊर्जा वाचवायला हवी. मानसिकतेच्या अनेक बाबी या संशोधनाने सिद्ध झालेल्या असतात. त्यात सुद्धा त्यात सुद्धा आणखीन वेगळं काही निसर्गतः शक्य नसेल तरीही तिकडे फार काळ गुंतून राहू नये.

उदाहरण म्हणजे, रागावर कंट्रोल नसेल तर नाती दुभंगतात, कामाचा आपल्या मानसिकतेवर आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो वगैरे या सर्व बाबी संशोधनाने सिद्ध झालेल्या आहेत.अशाच जगण्यातल्या अनेक छोट्या-छोट्या बाबी सिद्ध झालेल्या असतात त्या जशाच्या ताशा स्वीकारून काय साम्य आहे आणि काय भिन्न आहे याबाबत सजग असायला हवंय.

३) समस्या परिहार

तुमच्या ठिकाणी निर्माण झालेली समस्या नावीन्यतेने सोडवण्याची लकब तुमच्यामध्ये असायला हवी. रोजच्याच पद्धतीने त्या समस्या सोडवल्या जात असतील तर हे वर्तुळ असंच सुरु राहील. यासाठी तुमच्या मेंदूला हि सवय लावा. रोजच्या ठरलेल्या गोष्टींची लिस्ट बाहेर काढा आणि त्याला वेगळेपणाने करण्याचे रूप द्या.

जेणेकरून तुमचा मेंदू तिथपर्यंतच मर्यादित न राहता तो इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला नावीन्यतेसाठी मदत करेल. कारण तशी सवय तुम्ही तुमच्या मेंदूला जडवलेली असेल.

४) निर्णय क्षमता

स्वतःतली निर्णय क्षमता वाढवण्यासाठी अवतीभवती असणाऱ्या निरनिराळ्या लोकांच्या समवेत राहता आलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाला कसे तोंड दिले, कसे निर्णय घेतले याबद्दल तुमचे सूक्ष्म निरीक्षण असायला हवे. नजीकच्या काळात एखादा प्रसंग जरी घडला तरी त्यावर तुम्ही कशी मात करू शकता, याचं काल्पनिक दृश्य करून तुम्ही मनाचं स्ट्रॉंग व्यवस्थापन करू शकता.

५) सय्यमीपणा

आपल्यामधून सय्यमीपणा निसटला कि अगदी लहान प्रसंग सुद्धा मोठे रूप धारण करतात. अत्यंत घाई-गडबड, परिणामांचा अधिक विचार यातून सय्यमीपणा निघून जातो. हा आयुष्य जगण्यातल्या अत्यंत मोठा अडथळा होऊ शकतो.

प्राणायाम, मेडिटेशन, योगा यातून श्वासांवर एकरंगी राहून मनातली धाकधूक कमी करून सय्यमीपणा सहज वाढवता येऊ शकतो. तसेच एकाग्रता वाढवण्यासाठी श्वासांचे आवाज ऐकणे आणि श्वास उलट्या क्रमाने मोजणे हे पद्धत सुद्धा अत्यंत फायदेशीर म्हणून काम करते.

अशाप्रकारे वरील या ५ टिप्स तुमच्या स्ट्रॉंग मनाला आणखीन स्ट्रॉंग करण्यासाठी उपयोगी पडतील.तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

error: Content is protected !!