Skip to content
Home » कोण काय म्हणेल यापेक्षा मला काय हवंय हे जास्त महत्वाचं !

कोण काय म्हणेल यापेक्षा मला काय हवंय हे जास्त महत्वाचं !

कोण काय म्हणेल यापेक्षा मला काय हवंय हे जास्त महत्वाचं !


श्री. राकेश वरपे I ९१७५४२९००६

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


पुष्कळ वेळा आपण स्वतःपेक्षा इतरांचा सर्वात अधिक विचार करत बसतो. एखाद्याचं काम पूर्ण करण्यासाठी हवा तितका वेळ आणि ऊर्जा द्यायला आपण तयार होतो. काही वेळेस दुसऱ्यांसाठी अशी मदत करणे महत्वाचेही असते. परंतु स्वतःच्या सर्वच बाजूने जर आपण ठणठण गोपाळा असू, तर ?

तर मात्र आपल्याला स्वतःला काय हवंय, आपल्या जीवनाविषयी कोणत्या अपेक्षा आहेत, याचा आपण कधी विचारच केलेला नसतो. आणि जरी या गोष्टी आपल्याला माहिती असल्या तरी त्याच्यासाठी आपण कधी हवा तसा वेळच काढलेला नसतो.

आलेले दोन-तीन अपयश आपल्याला कायमचे बसवून ठेवतात. मग इतरांच्या नजरा आपल्याला छळायला लागतात. ती सगळी लोकं आपल्या-आपल्या जागी व्यवस्थित असतात. आपल्यालाच आलेलं नैराश्य त्यांच्या तोंडाकडे पहायला भाग पाडत असतं.

म्हणून अशावेळी कोण काय म्हणेल यापेक्षा मला काय हवंय याला आपण जास्त प्राधान्य द्यायला हवं.

सुमितला सारख्या लोकांच्या नजरा त्याच्याविषयी नकारात्मकच विचार करत आहेत, असंच कायम वाटायचं. त्याचं लक्षही त्याठिकाणी अतिप्रमाणात असल्यामुळे आतापर्यंत तो कधीच प्रगती करू शकला नाही. त्याला स्वतःला ज्या सवयी जडलेल्या होत्या. जसं कि, आपल्या आवाक्याबाहेर जायचं नाही, कोणाशी जास्त बोलायचं नाही, आपल्या गोष्टी कोणाला सांगायच्या नाही, लोकांशी तेवढ्यापुरतंच बोलायचं..वगैरे

सुमितने त्याच्या अवतीभवती जी काही ऊर्जा पसरवली होती, अगदी तशाच प्रकारच्या नैसर्गिक प्रतिक्रिया सुमितला रिटर्न येत होते. जर तुम्ही तेवढ्यापुरतीच राहणार असाल तर लोकं तुम्हाला तेवढ्यापुरतीच ठेवतील. का आपल्या शेजाऱ्यांशी चांगलं वागताना आपण लोकांना पाहतो??

जर दिलदार, मनमोकळं रहाल तर तुम्हालाही लोकांकडून तशाच प्रकारची दाद मिळते. त्यामध्ये भेटतील काही तुमच्यासारखी सुद्धा. पण अशांमध्ये फारसं अडकून राहायचं नाही. पॉसिटीव्ह एनर्जी पसरवली कि काही कालावधीनंतर तुम्हाला रिटर्न्स मिळायला सुरुवात होते.

ते रिटर्न्स कधी मिळतील, किती वेळ लागेल?? हा आपला भाग नाही. तुम्ही इन्व्हेस्ट किती प्रामाणिकपणे करताय यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. म्हणून इतरांकडून कोणतीही वायफळ अपेक्षा करण्यापेक्षा तुम्हाला असं वागणं पटतंय ना, आवडतंय ना, जमेल ना…केवळ याचाच विचार करा.

लोकं तुम्हाला स्वीकारतील कि नाही हा तुमचा भाग नाही. म्हणून सुमितने जी काही निगेटिव्हिटी त्याच्या अवतीभवती पसरवलेली होती, त्यामुळे त्याला आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी तोपर्यंत करता आल्या नव्हत्या.

या पॉसिटीव्ह विचारांची सुद्धा आपल्याला सवय लावणं गरजेचं आहे. तुम्ही आज पॉसिटीव्ह वागाल आणि अपेक्षित काही मिळालं नाही तर कंटाळा कराल आणि हे सगळं बेकार आहे, वायफळ आहे असं म्हणाल, म्हणजेच तुम्ही पुन्हा नको असलेली ऊर्जा अवतीभवती पसरवत आहात. आणि तुम्हाला पुन्हा तेच रिटर्न मिळणार.

जेव्हा तुमच्या विचारांमध्ये सातत्यता येते तेव्हा निसर्गाशी तुमचा ताळमेळ जुळण्याची प्रोसेस सुरु होते. तुम्ही लोकांना हवेहवेसे वाटू लागता. मग तुम्हाला ‘कोण काय म्हणतंय’ हा प्रश्न कधीच पडणार नाही. तुम्ही सदैव तुमच्या उन्नतीचा आणि तुमच्या सकट इतरांच्या आनंदाचा विचार करायला लागाल.

आपली लाईफ सुंदर आहे कि नाही हे तुमच्या विचारांवर आणि तुम्ही अवतीभवती काय पसरवत आहात, यावर ठरत असते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

error: Content is protected !!