Skip to content
Home » पूर्वीसारखा नवरा वेळ देत नव्हता, पण नंतर मात्र….

पूर्वीसारखा नवरा वेळ देत नव्हता, पण नंतर मात्र….

नात्यांमधला नाजूक धागा जपायला हवा…


सौ. मिनल वरपे


कोणाला हेवा वाटेल इतका गोड संसार त्या दोघांचा होता.. परिस्थिती अगदीच चांगली नसली तरी त्यामधे सुद्धा सुख मानून एकमेकांची साथ देत अगदी गोडीगुलाबीने भाविका आणि पारस च नात सगळ्यांना त्यांच्या वागण्यातून सगळ्यांना छान शिकवण देत गेले.

सकाळी उठायचं मस्त बाहेर चालायला जायचं.. वाटेत गप्पा मारायच्या.. घरी परतल्यावर दोघेही मिळून घरातली काम पटापट आवरायची आणि नंतर पारस त्याच्या कामावर निघून जायचा.. भाविक सुद्धा घरी राहून लहान मुलांची शिकवणी घ्यायची.. त्यामधे पैसा मिळेल याची अपेक्षा कमी आणि मुलांमधे राहून मिळणारा आनंद जास्त अपेक्षित असायचा भाविकाला..

पारस कामावरून येईपर्यंत शिकवणी घेऊन घर आवरून.. भाविका स्वयंपाकाची तयारी करायची .. मग पारस घरी आला की दोघे चहा घेत दिवसभरात काय काय घडल हे एकमेकांना सांगत.. त्यानंतर भाविका स्वयंपाक पूर्ण करायची आणि पारस टीव्ही बघत तिच्याशी अधून मधून बोलायचा..

रात्रीच जेवण झालं, सगळं आवरलं की दोघं अंथरुणात पडून दोघेही पुढची स्वप्न रंगवत , दिवसभरातील कामामुळे एकमेकांना जो वेळ द्यायला पाहिजे तोच वेळ द्यायचे.. एकमेकांची काळजी.. दिवसभरात आपला जोडीदार किती थकत असेल याची जाणीव ठेवणे, त्याला तिच्याकडून आणि तिला त्याच्याकडून काय अपेक्षित आहे,. संसार कसा फुलत राहील या सगळ्यांबद्दल दोघं रात्री वेळ काढून गप्पा मारायचे.

सगळं काही अगदी व्यवस्थित चालू होत.. पती पत्नीच्या नात्यात हवं असलेलं प्रेम, काळजी, विश्वास, जिव्हाळा सगळं ते एकमेकांना पुरेपूर देत होते. एकमेकांना न दुखवता अर्थात कधीतरी छोटी मोठी नोकझोक तर प्रत्येक नात्यात असावी तशी यांच्यातही होतीच…

नंतर पारसला बढती मिळाली.. दोघांनाही खूप आनंद झाला.. खर तर जे आहे त्यामधे समाधान होतच दोघांनाही पण बढती मिळाली म्हणून आनंद सुद्धा वाढला.

पण मिळालेल्या या बढतीमुळे त्या दोघांच्या नात्यात अबोला वाढत गेला.. दुरावा निर्माण झाला.. कारण बढती मिळाल्यामुळे जरी पगार वाढला असला तरी त्यासोबतच पारसच काम त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या.. आणि जर कामात लक्ष जास्त दिलं तर अजून बढती मिळत जाणार आणि आपली परिस्थिती एकदम उत्तामाची होणार हा विचार पारस च्या मनात आला..

आणि म्हणूनच पारस जास्तवेळ काम करू लागला.. घरी उशिरा येऊ लागला.. आल्यावर थकलेला असायचा त्यामुळे एकदाच जेवून घ्यायचा आणि अंथरुणात पडल्या पडल्या झोपायचा.. सुरवातीला भाविका समजून घ्यायची.. की बढती मिळाली त्यामुळे काम वाढल असेल… पण नंतर मात्र आतल्या आत दुखावली जायची कारण वाढलेल्या कामामुळे पारस रात्री आल्या आल्या झोपायचा आणि सकाळी उठून त्याच आवरून डब्बा घेऊन निघून जायचा..ना दोघांमध्ये दिवसभराच्या गप्पा व्हायच्या ना त्याला तिच्याशी बोलायला वेळ मिळायचा..

पारसला दिवस उगवायचा कधी ना मावळायचा कधी हे जस समजत नव्हत आणि इथे भाविकाला प्रत्येक क्षण जड जात होता याच विचाराने की पूर्वीसारखं काहीच राहील नव्हत..

त्यामुळे ती सुद्धा आतल्या आत विचार करून करून अबोल होत गेली…. कारण तक्रार करने तिच्या स्वभावातच नव्हत.. आहे त्यामधे समाधान मानणारी भाविका स्वतःलाच सांगत समजावत दिवस ढकलायचा प्रयत्न करू लागली.

एक दिवस पारसला मध्यरात्री अचानक जाग आली तेव्हा भविका एकटीच रडत बसलेली.. त्यावेळी त्याला जाणवलं की माझ्या कामामुळे मी तिला वेळ देऊ शकत नाही.. तिच्याशी चार शब्द सुद्धा मी नीट बोलत नाही .. जी भाविका माझ्याशी सगळं शेअर करायची आज तिचं इतकी एकटी पडली की आज अशी न सांगता न तक्रार करता एकटीच रडत बसलिये… मी वेळ दिला नाही म्हणून माझं राग न करता आज ती स्वतःलाच त्रास करून घेते .

माझं काम माझ्या संसाराला उपयोगी तर नक्कीच आहे पण त्याआधी माझी पत्नी सुखात राहील याची मला काळजी घ्यायची आहे. आणि तीच सुख हे तिला दिलेल्या, आपल्या नात्याला दिलेल्या वेळेतच आहे हे पारसच्या चांगलच लक्षात आलं..

पुन्हा तोच आणि अगदी तसाच वेळ तो भाविकाला देऊ लागला.. आणि पैसा, श्रीमंती यापेक्षा नात्यात असलेल्या जाणिवेला, काळजी , प्रेम आणि संवाद आणि एकमेकांना दिलेला वेळ याला महत्त्व देणारी भाविका नव्याने जगू लागली.. आणि त्यांचा संसार पुन्हा नव्याने सुरू झाला…तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “पूर्वीसारखा नवरा वेळ देत नव्हता, पण नंतर मात्र….”

Leave a Reply

error: Content is protected !!