Skip to content
Home » तुम्हांला तुमच्या भावना मांडता येत नसतील तर तुम्ही वाईटच ठरणार!

तुम्हांला तुमच्या भावना मांडता येत नसतील तर तुम्ही वाईटच ठरणार!

तुम्हांला तुमच्या भावना मांडता येत नसतील तर तुम्ही वाईटच ठरणार!


टीम Healthy मानसशास्त्र


योग्य वेळी योग्य भावना मांडता न येणं आणि नको त्या ठिकाणी नको त्या भावना बाहेर पडणं ही आपल्यापैकी अनेकांची समस्या आहे. यातून भावना साचून-साचून त्या कोरड्या होण्याची वेळ येते आणि पुढे चालून कोणत्याही गोष्टीचा नाही आपल्याला वाटत आणि नाही कोणत्याही दुःखात आपल्याला रडु येतं.

पण आतल्या आत इतका त्रास होतो की तो त्रास बाहेर येण्यासाठी सुद्धा योग्य भावना साथ सोडून जातात. त्यामुळे आपलं म्हणणं, आपली बाजू, भूमिका, भावना समोरच्यांपर्यंत पोहोचवता येत नाही.

कित्येकदा समोरचा आपल्या भावनांची कदर करत नाही या नैराश्यातून आपल्या मनाला अशी सवय जडलेली असते. आपल्या अवतीभवती आपल्याला समजून घेणारं एकही नाही त्यामुळे उगाचच आपलं म्हणणं मांडून हाती लागणाऱ्या पाश्चातापाला ही माणसं कधीतरी घाबरलेली असतात. त्यातून मग पुढे त्यांना अशा गोष्टींचा सामना करावा लागतो.

इतरांच्या नजरेत या व्यक्तींना भावाना नक्की आहेत की नाही असा जणू प्रश्नच पडलेला असतो. परंतु भावनांचा कधीतरी झालेला कोंडमारा त्यातून या व्यक्ती गेलेल्या असतात, हा इतिहास मात्र प्रत्येकाला समाजतोच असं नाही.

अशा व्यक्तींचे पर्सनल रिलेशन कायमच विचलित पहायला मिळतात. शेअरिंग करणं, भावानं व्यक्त करणं, मनातले हितगुज सांगणं, इच्छा व्यक्त करणं, योग्य अपेक्षा ठेवणं या बाबी कोणत्याही पर्सनल रिलेशनशिप मध्ये असलेला मूलभूत ढाचा आहे.

हा ढाचाच या व्यक्तींचा कच्चा किंवा निकामी असल्याने त्या नाते संबंधांचा त्यांना आनंद अजिबात घेता येत नाही आणि नाही दुसऱ्याला देता येत.

जसं आपण पाहिलं की या व्यक्तींच्या भूतकाळातील घडलेले काही प्रसंग आणि त्यातून मनाचा झालेला प्रचंड कोंडमारा कारणीभूत जरी असला तरी त्यांना कधी व्यक्त व्हायचंच नसतं असंही नाही. एक ठराविक काळ लोटल्यानंतर त्यांना सुद्धा स्वतःला मोकळं करायचं असतं.

पण ती मोकळं होण्याची प्रक्रिया जरा सामान्य लोकांपेक्षा वेगळी असते. समोरच्या व्यक्तीने केवळ ऐकून न राहता त्यांना बोलतं करणंही महत्वाचं असतं. तसेच तुम्ही मनात काहीतरी उद्देश ठेऊन त्यांच्याशी बोलत आहात, कदाचित ही गोष्ट त्यांना रुचतही नाही.

अशा लहान-सहान, छोट्या-छोट्या गोष्टीचं ज्ञान आपल्याकडे असायला हवं. मग सातत्याने काही दिवसानंतर कोंडलेल्या भावनांचा निचरा होतो आणि त्या व्यक्तीला वास्तवतेचं भान यायला लागतं.

हे असं अनुकूल वातावरण त्यांना मिळायला हवं. नाहीतर त्यांच्या भावना अशाच दबक्या स्थितीत कायम राहून त्यांना मानसिक आणि शारीरिक व्याधी जडण्याची शक्यता वाढते.

म्हणजे त्यांना त्रास तर होईलच, पण त्यांच्यामुळे तुम्हालासुद्धा होईल!!तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

error: Content is protected !!