Skip to content
Home » मोठ्या वयाच्या मुलीसोबत त्याने लग्न केलेच..!!

मोठ्या वयाच्या मुलीसोबत त्याने लग्न केलेच..!!

मोठ्या वयाच्या मुलीसोबत त्याने लग्न केलेच..!!


टीम Healthy मानसशास्त्र


ती जॉब वरून घरी येत होती.. नवीनच जॉब होता तिचा त्यामुळे सगळच नविन आणि अवघडल्यासारखं … त्यामुळे आजबजुला तीच अजिबात लक्षच नव्हतं.. ती तिच्याच विचारात इतकी मग्न होती की तिची नजर जरी रस्त्यावर असली तरी डोक्यात मात्र अनेक विचार… आणि त्याचवेळी रस्ता क्रॉस करताना ती एका गाडीसमोर आली पण तेवढ्यात तिला भान आल आणि ती मागे झाली.. आणि सॉरी सॉरी म्हणत पुढे निघून गेली.. ती त्यावेळी इतकी सुंदर दिसत होती की तिच्यापुढे सगळे फिके असच साहिलला त्यावेळी जाणवलं..

त्यानंतर रोज त्याचवेळी तो तिची तिथेच वाट बघायचा.. लांबूनच तिच्याकडे पाहत तो आतूनच खुश व्हायचा.. पण श्वेताला याचा अजिबात थांगपत्ताच नव्हता..

एकदा श्वेता तिच्या कामानिमित्त सरकारी कार्यालयात गेली.. आणि तिला पाहून साहिल एकदम गोंधळून गेला, तो तिथेच काम करत होता… त्याला खूप आनंद झाला पण तो तिला काही सांगू शकत नव्हता..

श्वेता येऊन त्याच्याकडे कामाची चौकशी करत होती.. माहिती विचारत होती.. त्याने तिला सर्व माहिती दिली आणि नंतर श्वेता निघून गेली पण सरकारी काम म्हणजे फेऱ्या चालणारच..

जशा तिच्या फेऱ्या वाढू लागल्या तेवढ्यातच त्यांची ओळख वाढत गेली.. नंतर साहिलने वेळ वाया न घालवता लगेच श्वेताला लग्नाचं विचारलं.

त्यावर श्वेता मात्र नाही बोलली आणि तिथून निघून गेली.. पण साहिल ला त्याच उत्तर मिळालं नाही म्हणून तो तिच्या मागे गेला.. पण श्वेता फक्त काहीच न बोलता दुर्लक्ष करू लागली..

काही दिवसांनी साहिल ने श्वेताला हट्टाने विचारलं की नक्की काय कारण आहे नकार देण्याचं.. मी चांगला शिकलो आहे.. जॉब करतोय.. आपण एकमेकांना ओळखतो.. मग नक्की प्रॉब्लेम कुठे आहे..

त्यावर श्वेता बोलली की मला नाही जमणार लग्न करायला.. मुळात मी लग्नचं करणार नाही कुणाशीच.. माझ्या घरची परिस्थिती खूप हलाखीची आहे आणि म्हणून मला मिळेल तसे जॉब मी करते, काही दिवस सगळं ठीक वाटते पण नंतर शिक्षण कमी असल्यामुळे पगार कमी देतात तर काहीवेळेस पगार सुद्धा देत नाही..मला खूप काही करायचं आहे घरच्यांसाठी…. आणि तसपण जबाबदाऱ्या सांभाळत माझं लग्नाचं वय कधी उलटून गेलं मलासुद्धा कळलं नाही… तू लहान वयाचा तर एकतीस वय आहे माझं..

ऐकून नवल वाटणार तर नाही कारण माझं वय माझ्या चेहऱ्यावरून कोणालाही कळेल… ती संतूर साबण मी नाहीना वापरत अस थट्टेत बोलत तिने साहिलला लग्न न करण्याचं कारण अगदी स्पष्ट सांगितल..

त्यावर साहिल एकच म्हणाला अग तू वयाच घेऊन बसली आहेस.. पण मला वयाचा काहीच फरक पडत नाही आणि तू तुझ्या जबाबदाऱ्यांच म्हणशील तर लग्नानंतर मुली जर सासरी सगळे आपली माणसं मानून सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात. अगदीच तस मुलं सुद्धा स्वतःच्या सासरच्या सर्व जबाबदाऱ्या अगदी आनंदाने पार पाडू शकतात..आणि तू फक्त हो बोल.. मी तुला प्रेमाचं वैगेरे नाही तर डायरेक्ट लग्नाचं विचारतोय..

यावर श्वेता नाही म्हणाली.. आणि पुन्हा आपण न भेटलेल उत्तम इतकंच बोलून तिथून निघून गेली.. साहिल मात्र इतका नाराज झाला की त्याच कशातच लक्ष लागत नव्हत.. त्याची नाराजी त्याच्या वागण्याबोलण्यातून स्पष्ट दिसत होती.. म्हणून त्याच्या आईच्या ते लक्षात येताच तिने त्याला कारण विचारलं..

साहिल ने सगळं खर सांगितल.. पण अगदी चित्रपटात दाखवतात तसचं उत्तर त्याच्या आईने दिलं.. अरे वयाने मोठी आहे तुझ्यापेक्षा तुला कळतेय का..?? अस कुठे बघितलय का नवऱ्यापेक्षा बायको वयाने मोठी…?? लोक काय म्हणतील?? आणि कशी वाटेल तुमची जोडी..?? आमचा तुझ्यावर किती विश्वास होता पण आता मला विश्वासच बसत नाही तुझ्या विचारांवर..

यावर साहिल ने त्याच्या आईला समजावलं.. अग बघ वयाने मोठी असली तर काय झालं.. मुली नाहीका मोठ्या वयाच्या अगदी १०/ १२ वर्षाने मोठ्या मुलासोबत म्हणजे त्याला माणूस म्हणायला पण हरकत नसते त्यांना, अशा मुलांशी सुद्धा लग्न करतात.. तेव्हा का कोणी वयातील अंतर बघत नाही..

तिथे हाच विचार असतोना की पती पत्नी मधे एकाच वय जास्त असेल तर संसारात ती व्यक्ती जास्त समजदारीने वागते मग बघना ती माझ्यापेक्षा मोठी आहे मग ती किती सांभाळून घेईल सगळ्याच गोष्टी.. माझ्याकडून कळत नकळत जरी चुका झाल्या तरी त्यावरून भांडण करण्यापेक्षा ती मला समजून घेईल.. म्हणजे आमचं नात किती छान राहील..

जर आमचं नात चांगलं असेल तर तुम्हाला सुद्धा कसली चिंता राहणार नाही.. जर ती मला समजू शकते तर ती तुम्हाला सुद्धा तेवढच समजून घेईल.
आज ती तिच्या घरच्या जबाबदाऱ्या इतक्या मनापासून स्वीकारून सांभाळते की तिला वयाच भान नाही राहील.. जर ती आपल्या घरी आली तर एक पत्नी, एक सून, एक वहिनी म्हणून सगळ्याच नात्यात ती उत्तम असेल.. ती आपल्या घरच्या जबाबदाऱ्या सुद्धा वीणा तक्रार पार पाडेल..

अग माझ्यापेक्षा वयाने लहान असलेली मुलगी असो नाहीतर ही .. जोडी ही दिसण्याने नाही शोभली तरी चालेल पण एकमेकांची साथ देणार, समजून,सांभाळून घेणार, एकमेकांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल अस नात असावं..

अग लोक काय आज अस बोलतात उद्या वेगळं काही बोलतील.. त्यांना जे बोलायचं ते बोलुदेत आपलं घर सांभाळायला लोकांची गरज नाही तर एका आदर्श मुलीची गरज आहे..

ज्या मुलीला जबाबदाऱ्या माहीत आहे.. घरची काळजी आहे.. माणसांची ओढ आहे.. जिच्यात नम्रता आहे आणि हा मी लग्नाचं जेव्हा तिला विचारलं तेव्हा माझ्यासारख्या मुलाला कोणी असच नाही बोलू शकत नाही पण तिने नाकारलं.. ती हो बोलू शकत होती पण तिला तिचा स्वार्थ बघायचा नव्हता.. तिला तिच्या वयाची जाणीव होती..आमच्यातील वयाच अंतर मी जरी महत्त्वाच नाही समजलो तरी माझ्या वागण्याचा फायदा तिने घेतला नाही..

अग कमी वयाच्या भरपूर मुली भेटतील मला.. पण इतक्या चांगल्या मुलीला फक्त वयाच्या कारणाने आयुष्यातून दूर नाही करायचं मला..

साहिलच्या बोलण्यातून आईला त्याचे विचार पटले आणि आईला खूप कौतुक वाटलं त्याच.. कोणताच विरोध न करता तिने घरी सर्वांना समजावलं आणि श्वेताच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांना श्वेता मला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून माझ्या घरी हवी अशी मागणी केली..

त्यांचं दोघांचं लग्न अगदी रितसर झालं आणि आज श्वेता सगळेच नाते अगदी सहजपणे मायेने जपते..

खरचं वय महत्त्वाच नसते… महत्त्वाच असतो तो स्वभाव.. वागणं बोलणं.. आणि मुलीच वय जास्त म्हणून नकार देण्याची मानसिकता आता बदलायला हवी.. काही मुली त्यांचं शिक्षण पूर्ण करतात..त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असते तर काही मुली परिस्थिती बिकट असल्याने त्यांना घरच्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतात, काही मुलींना सुरवातीला लग्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जायचं मग तिथे मला सगळ जमेल की नाही हीच भिती असते तर काहींना सगळ्याच गोष्टी मनासारख्या हव्या असतात पण नंतर लक्षात येते की अशा अपेक्षा चुकीच्या आहेत..

यासारख्या अनेक कारणांमुळे मुलींचं लग्नाचं वय निघून जाते.. मग अशा मुलींसोबत लग्न करण्यास बहुतेक मुल किंवा त्याच्या घरचे टाळतात.. पण खर तर हेच आहेना की पती किंवा पत्नी दोघांमधील वयापेक्षा त्यांच्यातील प्रेम, काळजी आणि विश्वास महत्वाचा.. आणि हे सर्व दिसण्यातून नाही मिळत किंवा यासाठी वय सुद्धा महत्त्वाच नसते तर महत्त्वाच काय असते तर ती म्हणजे योग्य व्यक्ती…



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

error: Content is protected !!