कोणताही बदल आपल्याला परिस्थिती स्वीकारायला शिकवतो!!
सौ. मिनल वरपे
ज्यावेळी आपल्याला खूप उदास वाटते.. काहीही झालं तरी क्षणात आपण निराश होतो..सगळं अगदी निरर्थक वाटू लागते.. कोणी काहीही बोललं तरी आपल्याला सहन होत नाही.. कशातच रस वाटत नाही.. नेहमीची आपल्या जवळची माणसं काही बोलले तरी लगेच वाईट वाटत.. एकटेपणा जाणवतो..
त्यावेळी आपण काय करतो..??? आपण त्यावेळी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा इतरांना दोष देतो.. परिस्थितीला दोष देतो.. पण त्याचवेळी आपण स्वीकार केला पाहिजे तो म्हणजे स्वतःमध्ये बदल करण्याचा..
आपण तेच तेच कायम विचार करतो.. सतत तेच वागतो.. वेळ बदलते.. सकाळची संध्याकाळ होते.. रात्रीचा दिवस होतो.. जर निसर्ग आपल्याला गरजेनुसार बदल शिकवतो तर आपण का नाही समजून घ्यायचं..???
आपण इतरांकडून बदलाची अपेक्षा करतो.. हा तर माझ्याशी आतापर्यंत चांगल वागत होता आज अचानक काय झाल याला अस वागायला..हा खूप वेगळा वागतोय.. अरे ही माझ्याशी अस का बोलतेय.. पण या सगळ्याचा विचार करून त्यामध्ये अडकण्याची ही वेळ नसते… आणि आपण नेमकी तेच करतो..
आपण सतत हाच विचार करतो की हे अस कस वागू शकतात.. इतर कोणी काय वागते यापेक्षा मला कस वागल पाहिजे हे लक्षात घेऊन आपण स्वतःमध्ये बदल केले तर नक्कीच आपल्या इतरांकडून अपेक्षा वाढणार नाही…
इतरांच्या वागण्याचं बाजूला ठेवा पण आपण आपलं काम योग्यरीत्या करत असतो अगदी अचूक पण काहीवेळेस अशी काही चूक आपल्याकडून घडते आणि सगळच बिघडून जाते. आणि त्यावेळी सुद्धा आपण हाच विचार करत वेळ घालवतो की हे सगळं अचानक कस घडल.. मी तर नेहमीप्रमाणे त्याच पद्धतीने सगळं केलं मग आताच का ही चूक घडावी…
पण यावेळी आपण त्या घडलेल्या चुकीतून शिकायची गरज असते आणि तेच काम करण्याच्या आपल्या पद्धतीत बदल करण्याची गरज असते..
बदल हा गरजेचा असतो.. काळानुसार जस आपण आपल्या राहणीमानात बदल करतो तसेच आपल्या वागण्यात तसेच विचारांमध्ये सुद्धा बदल केले तर कधीच, कोणत्याही वेळी, कोणतीही परिस्थिती , कोणतीही व्यक्ती, कोणाचं वागणं, कोणाचे बोलण आपल्यावर परिणाम करणार नाही..
आपलं नैराश्य.. आपल्यातील नकारात्मकता ही आपल्याच विचारांमुळे वाढत असते.. म्हणून आता आपणच आपल्याला त्रास देणाऱ्या नकारार्थी विचारांना थांबवंल पाहिजे आणि प्रत्येक वेळी काहीही घडल तरी त्यावेळी कोणाकडून कोणतीच अपेक्षा न करता स्वतःमध्येच बदल केला तर येणाऱ्या प्रत्येक क्षणात आपण जे घडेल त्याची काळजी न करता त्याचा स्वीकार करू…
कारण बदल माणसाला परिस्थिती स्वीकारायला शिकवतो.. बदल माणसाला निराश राहण्यापासून लांब ठेवतो.. बदल माणसाला अस्वस्थ होण्याची वेळ येऊ देत नाही… बदल इतरांवर अवलंबून न राहता कोणाकडून कोणतीच अपेक्षा न करता स्वावलंबी जगायला शिकवतात.. म्हणून योग्य वेळी योग्य तो बदल आपण आपल्यामध्ये करावा म्हणजेच आपल्याला समोर येईल ते अगदी सहज स्विकारता येते…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
Valuable information. Lucky me I found your website by accident, and I’m shocked why this accident did not happened earlier! I bookmarked it.