Skip to content
Home » हळवेपणा बाजूला ठेऊन वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

हळवेपणा बाजूला ठेऊन वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

हळवेपणा बाजूला ठेऊन वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.


सौ. मिनल वरपे


जे आहे ते आहे ते बदलेल तेव्हाच जेव्हा आपण त्याला सामोरे जाऊ.. त्याच्यासमोर हिमतीने उभे राहून… प्रयत्न करायचा निश्चय बाजूला सारून देणार नाहीत..

काल अचानक जे घडलं ते ऐकून अभय पार खचून गेला… त्याच्या लहान बहिणीच्या झालेल्या अपघाताची बातमी ऐकताच तो खूप घाबरला.. डॉक्टर त्यांच्या सगळ्या तपासण्या झाल्यावर बोलले की तिचा जीव वाचण्याची शक्यता फारच कमी आहे.

अभय चा त्याच्या बहिनीमधे प्रचंड जीव.. एकमेकांशी जितके भांडायचे तेवढच त्यांच्यात प्रेम सुद्धा होत. म्हणतात ना तुझ माझं जमेना तुझ्याविना करमेना अगदी असच त्यांचं नात.. पण बहिणीच्या अपघातामुळे आता पुढे काय होणार या विचारानेच तो पूर्ता कोलमडून गेला… घरच्यांना सांभाळायचं सोडून तो स्वतःच इतका हळवा झाला की त्यालाच धीर देण्याची गरज पडली..

यावेळी खर तर अभयने सर्वांना धीर देत खंबीर राहायची गरज होती .पुढच्या क्षणाला काय घडेल याची कल्पना कोणालाच नव्हती. पण या क्षणाला घाबरून हळवं होण म्हणजे वास्तवाची भिती बाळगणे. जे होणार की नाही याची खात्री नसताना सुद्धा त्या क्षणाची आधीच भीती वाटते त्यावेळी आपण वास्तवात जगत नसतो.

खर तर वास्तवाचा स्वीकार करणे तितकं सोप्पं नसते पण त्याचा केलेला स्वीकार आपल्याला खंबीर राहण्यासाठी बळ देते. आपण पुढच्या वेळेचा विचार करतो आणि घाबरतो त्यामुळे आता जे घडतेय त्याकडे बघण्याची हिम्मतच आपण करत नाही.

पुढे जे होईल ते होईल असा दृष्टीकोन जर आपण ठेवला ते आज जे आहे त्यामधे आपण मागे फिरणार नाही. हळवेपणा आपल्यात उरणार नाही जेव्हा आपण पुढच्या वेळेचा नकोतो विचार सोडून आज जे आहे त्यामधे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर.

उद्या परीक्षा आहे.. पेपर कसा असेल.. काय प्रश्न येतील अशी भिती मनात दडवून ठेवली तर आपण जास्त घाबरणार.. भीतीमुळे कधी चिडचिड करणार तर कधी रडणार हळवे होणार.. पण तेच जर उद्याचा विचार न करता आजच्या वेळेला सामोरे गेलो चांगला अभ्यास केला तर नक्कीच मनात कोणत्याच विचारांना जागा उरणार नाही.आणि आपण सकारात्मक राहून येणाऱ्या परीक्षेला न घाबरता सामोरे जाणार.

आज कोरोनाचा विषय सुद्धा असाच आहे.. मला कोरोना झाला तर, माझ्या घरातील माणसांना कोरोना झाला तर या विचारानेच आपण आजच इतके घाबरतो की आपल्याला आज काय घडतेय त्यामधे काहीच आनंद घेता येत नाही. कोरोना झाला तर काय झालं मी त्यातून लवकर बरा होणार त्यातून सुद्धा मला बाहेर पडता येईल असा सकारात्मक विचार करून वास्तवाला सामोरे जाण्याची आपण हिम्मत केली तर नक्कीच आपल्यातील हळवेपणा दूर होईल.

आज कोरोना तर उद्या आणखी काही.. कोणाचे अपघात तर कोणाचे मृत्यू.. कोणी आपल्या आयुष्यात येणार तर कोणी आपल्यापासून कायमचे दूर जाणार.. दुःख संकट हे येत राहणारच पण जे आहे त्याचा स्वीकार करत वास्तवाला प्रत्येकाला सामोरे जावेच लागते. जे वास्तवाला सामोरे जाण्याची हिंमत करत नाही ते आयुष्यात मागे पडतात तसेच कमजोर होतात.

आपल्या आयुष्यात तसेच आपल्या माणसांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाताना जे वास्तव आहे त्याचा सकारात्मक विचार ठेवून स्वीकार केला तर हळवेपणाला जागाच उरणार नाही. वास्तव बदलता येईल पण त्यासाठी त्याला सामोरे जाण्याची तयारी असेल तरच… म्हणून हळवेपणा बाजूला सारून वास्तवाला सामोरे गेलो तरच पुढे जाण्याचे मार्ग मिळणार आणि त्या मार्गात यश मिळणार.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

error: Content is protected !!