तुम्ही सुद्धा कधी कोणाला समजण्यात चुकलात का ??
सुनीताला घरच्यांनी खूप लाडात लहानाचं मोठं केलं..तिला तिच्या आईवडिलांनी बाळा शिवाय कधी दुसऱ्या नावाने हाक सुद्धा दिली नाही.. आणि अशा या वातावरणात राहिल्यामुळे सुनीताला लाडाची प्रेमाची सवय झालेली…
सूनिताच लग्न झालं.. एक मोठं कुटुंब तिला मिळालं. लग्नानंतर तिला जबाबदारीने वागायचं हे जरी माहीत असल तरी जस माहेरी लाड झाले जस माहेरी ओंजरून गोंजरून तिला वाढवलं अगदी तसेच सासरी सुद्धा मिळेल अशी तिची अपेक्षा होती.
पण सूनिताची सासू खूप शांत स्वभावाच्या त्यामुळे तिला वाटायचं की त्यांचा तिच्यात अजिबात जीव नाही. त्यांना जास्त बोलायची सवय नव्हती त्यामुळे त्या जमेल तेवढं बोलून आपलं काम करत बसायच्या.त्यामुळे सुनीताला खूप वेगळं वाटायचं.
पण नंतर तिच्या नवऱ्याने तिला सांगितलं की प्रेम आणि माया ही शब्दात सांगण्याची गरज नसते. समोरचा आपली किती काळजी करतो हे त्याच्या वागण्यातून ओळखायचं. सर्व माणसं सारखी नसतात. कोणाला बोलून व्यक्त व्हायची सवय असते तर कोणी शांत राहून त्यांच्या वागण्यातून व्यक्त होतात.
त्यानंतर सूनिताने सासूच्या वागण्यातून जाणून घेतलं आणि खरचं सूनिताच्या लक्षात आले की तिची सासू जरी शांत असली तरी सुनीताला जास्त काम करावं लागणार नाही म्हणून बरेच काम तिला न दाखवता करायच्या.. सुनीताला जेवणात काय आवडते हे जाणून त्या नेहमी तिच्या आवडीनुसार जेवण बनवायच्या फक्त सुनीताला आवडते म्हणून केलंय अस कधीच बोलत नसत.
सुनिता आजारी पडल्यावर तिने आराम करावा म्हणून सर्वात लवकर उठून त्या सर्व काम आवरायच्या.तिने कोणतेही काम केली तरी थकशील असे न म्हणता त्या तिला सांगायच्या की जा रूम जाऊन बस.. सून आली आहे म्हणून आराम करावा असे त्यांचे विचार नव्हते त्या कायम जास्तीत जास्त तिला कामात मदत करायच्या कारण तिच्या अंगावर जास्त काम पडू नये…
या सासूच्या वागण्यातून सुनीताला तिचे आधीचे विचार खूप चुकीचे होते हे लक्षात आले. खरचं नात कोणतही असो..आणि माणसं सुद्धा कोणतीही असो पण प्रत्येकाची वागण्याची आणि व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी असते. आणि जर आपल्याला फक्त शब्दांची भाषाच कळत असेल तर आपण कुठेतरी नक्कीच चुकीचे विचार करणार..
पूर्ण जाणून न घेता कोणत्याही व्यक्तीला आणि तिच्या स्वभावाला एखाद लेबल लावण्यात किंवा दोष देण्यात काहीच अर्थ नसतो. नंतर पश्र्चाताप करण्यापेक्षा आधीच जाणून तसे आपण वागलो तर आपल्याकडून कोणाला समजण्यात चूक होणार नाही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
Like it