बिघडता कधीही येतं… घडता यायला हवं!
शिवाजी भोसले I 9689964143
आई-वडील हे आपल्या मुलांवर वाईट, चुकीचे संस्कार करू शकत नाहीत? त्यांना जे जे योग्य चांगलं वाटतं, ते ते मुलांना सांगितलं जातं. मात्र त्यातलं कितपत स्वीकारायचं आणि कितपत सोडायचं हे सर्वस्वी मुलांवर अवलंबून असतं. ओल्या मातीला कुंभार जसा आकार देतो तसं त्याचं भांड घडत जात असतं. त्या मातीला कोणता आकार द्यायचा? हे सर्वस्वी त्या कुंभारावर अवलंबून असतं.
घडण्याच्या प्रक्रियेपासून घडण्यापर्यत प्रत्येक टप्पा, प्रवास महत्वाचा असतो. घडण्याच्या प्रक्रियेत एखादा घोळ झाला तर घडणंही अवघड होऊन बसतं. त्यामुळे बिघडणं जेवढं अवघड नसतं. त्यापेक्षा कितीतरी अवघड घडण असतं. बिघडायला वेळ लागत नसतो खरा वेळ घडायला लागतो. तेव्हा बिघडण्यापेक्षा घडणं अधिक महत्त्वाचं वाटायला लागतं.
बालमनावरती कोणते संस्कार करायचे ? मुलांचं पालन पोषण, संगोपन त्याच्या जीवनाची जडणघडण कशा पद्धतीने करायची ? हे सर्वस्वी आई-वडिलांवर अवलंबून असतं. यातून आयुष्याच्या प्रवासाची बांधणी सुरू होते. आईवडिलांनी मुलांच्या मेंदूत जे कोरलं, बिंबवलं तेच पुढे कायमस्वरूपी राहत असतं. मुलांचे घडण आणि घडवणं हे सुद्धा एक आईवडिलांसमोर आव्हानच असतं.
आपला मुलगा कुठल्याही वाईट वळणावर जाऊ नये, त्याला वाईट संगती लागू नयेत, असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. त्यांना असं वाटणं हे सहाजिक आहे. मुलांविषयी असलेले प्रेम, आपुलकी, सहानुभूती, जिव्हाळा, संबंध, सहवास यातून अनेक गोष्टी घडत असतात. मात्र कालांतराने अनेक मुलांना वाईट व्यसन, चुकीची संगत, पद्धती लागते.
यामध्ये मात्र आई-वडिलांनीच दोषी ठरविलं जातं? हे कितपत योग्य आहे. कोणतेही आई-वडील हे आपल्या मुलांवर वाईट, चुकीचे संस्कार करू शकत नाहीत? त्यांना जे जे योग्य चांगलं वाटतं, ते ते मुलांना सांगितलं जातं. मात्र त्यातलं कितपत स्वीकारायचं आणि कितपत सोडायचं हे सर्वस्वी मुलांवर अवलंबून असतं. आई-वडिलांनी सांगितलेलं मुलांनी पूर्णपणे स्वीकारलं असं कधीच होत नाही. मुलांना त्या क्षणाला काय योग्य वाटतं? तेच मुले करत असतात.
अगदी संगणकीय प्रणाली सारखं मानवी जीवन असतं. जणू माणसाच्या मेंदूचा रचनेवरून संगणकीय कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. माणसांच्या कोऱ्या मेंदूमध्ये जे कोरलं जातं ते कायमस्वरूपी त्याच्या मेंदूत असतं. माणूस कोऱ्या संगणकात जे टाकतो तेच त्याला आउटपुट म्हणून मिळत असतं.
संगणक चूक बरोबर याची शहानिशा न करता जसं स्वीकारलं तसंच आऊटपुट देत असतो, तशाच प्रकारची माहिती तो स्वीकारतो. अगदी मानवी जीवन तसंच आहे. बालपणी आई-वडील, कुटुंब, समाज आपल्या मेंदूत जे कोरत असतो, तेच कायमस्वरूपी आपल्या मेंदूत साठवलेलं असतं. बालपणीचे सवंगडी, आई-वडिलांचे संस्कार, पद्धती, संस्कृती यातून माणसाची जडणघडण सुरू होते.
त्या आधारे मानवी जीवनाचं संगोपन पालन-पोषण वाढ घडून माणूस घडण्याची एकंदरीत प्रक्रिया सुरू असते. यातूनच पुढील आयुष्याची सारी उत्तर बालपणीच्या घडण्यातून मिळत असतात.
मानवी जीवन हे असंख्य खाचखळगे, संकट समस्यांनी भरलेलं असतं. यातून मार्ग काढत पुढे जावं लागतं. प्रत्येक क्षणाला कोणती ना कोणती संकटे माणसाच्या पुढ्यात उभी ठाकलेली असतात. या संकटांना घाबरून मागे कधीच परतू नये तर त्या संकटांवर मात करून समस्या सोडून पुढे जायचं असतं. संकट ही समस्या म्हणून नव्हे तर संधी म्हणून समोर येत असतात.
तुमच्यातील क्षमता, कल्पकता, शक्ती तपासण्यासाठी संकटे येतात. संकटाला संधी म्हणून शोधलं की आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागत नसतो, पण संकटाला समस्या म्हणून पाहिलं की असंख्य गोष्टींचा डोंगर समोर उभा दिसतो आणि इथेच माणसाचा पराभव ठरलेला असतो.
ओल्या मातीला कुंभार जसा आकार देतो तसं त्याचं भांड घडत जात असतं. त्या मातीला कोणता आकार द्यायचा? हे सर्वस्वी त्या कुंभारावर अवलंबून असतं. ओल्या मातीला दिलेला आकार जेव्हा भांड्याच्या रूपानं बाहेर पडतो, तेव्हा पुन्हा त्या भांड्याला आकार देता येणे शक्य नसतं. जोपर्यंत ओली माती हातामध्ये असते, तोपर्यंत त्या मातीला घडवणं हे आपल्या हाती असतं. एकदा का ओल्या मातीचे भांडे घडलं की पुन्हा घडविता येत नसतं. घडवण्याची प्रक्रिया सुद्धा एक वेळेस घडत असते, त्यामुळे काय घडवायचं आणि कसं घडवायचं? हे सर्वस्वी त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. त्यामुळे घडविण्याच्या प्रक्रियेवर प्रचंड मोठी मेहनत घ्यावी लागते.
मानवी जीवनात आजूबाजूला शेकडो अशा घटना घडत असतात, ह्या घटना अनेक वेळा मानवी जीवनाला सकारात्मक उभारी देणाऱ्या ठरतात तर अनेक वेळा ह्या संकटांचा अजगर मानवी जीवनाशी घट्ट मिठी मारून बसलेला असतो. यातून अनेक व्यसन, वाईट संगती जडतात. स्वतःचं वाईट व्हावं असं कुणालाच वाटत नसतं.
पण ते का होत असावं हे ज्याचं त्याला माहिती. आयुष्यात वाईट वळणावर कोणालाच जायचं नसतं. मात्र जीवनात आलेली परिस्थिती, प्रसंग त्या वाईट वळणावर माणसाला नेऊन ठेवतात. आयुष्याच्या नाजूक वळणावर आलेल्या प्रत्येक टप्प्याला हळुवारपणे हाताळावे लागत असतं. जीवनाचे टप्पे कसे हाताळावे ? त्यांना कशा पद्धतीने सांभाळता यावे ? याचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण जरी कुठे मिळत नसतं तरी सभोवतालच्या घडणाऱ्या घटना, प्रसंग याचं आत्मचिंतन माणसाला करता यायला हवं.
घडण्याच्या प्रक्रियेपासून घडण्यापर्यत प्रत्येक टप्पा, प्रवास महत्वाचा असतो. घडण्याच्या प्रक्रियेत एखादा घोळ झाला तर घडणंही अवघड होऊन बसतं. त्यामुळे बिघडणं जेवढं अवघड नसतं. त्यापेक्षा कितीतरी अवघड घडण असतं. अगदी सहजतेनं माणसाला एखादे व्यसन लागू शकतं, तो त्या व्यसनाच्या अर्ध, पूर्णआहारी केव्हा जातो ? हे त्याचे त्याला कळत नाही.
एखादं व्यसन करणं, दारू पिणे, सिगरेट ब्रिस्टॉल ओढणं हे सहजतेन करता येऊ शकतं. पण तेच व्यसन सोडायचं म्हटलं की प्रचंड मोठे सामर्थ्य लागतं. अगदी सहजासहजी जसं व्यसन लागतं, तसं ते सोडवता येत नसतं. त्यामुळे बिघडायला वेळ लागत नसतो खरा वेळ घडायला लागतो. तेव्हा बिघडण्यापेक्षा घडणं अधिक महत्त्वाचं वाटायला लागतं.
एखाद्या व्यक्तीची सहजतेने कुठे ना कुठे कशा पद्धतीने ओळख होऊ शकते? ओळख होणं हे फारसं अवघड नाही, ओळखणं अवघड असत. मानवाला ओळखणं हे खूप प्रचंड मोठं अवघड असतं. ओळख होणं स्वाभाविक असतं पण त्याच व्यक्तीला ओळखणं प्रचंड कमालीचं अवघड असतं. मानवाच्या अंतरंगात नेमकं दडलय तरी काय ? हे अध्याप कुणाला ओळखता आलं नाही मग त्या व्यक्तीला ओळखणं कितपत अवघड असावं? हे प्रत्यक्ष कृतीतूनच समजून येतं.
एकदा का व्यक्तीला ओळखणं सोपं झालं की घडण्याची प्रक्रिया लक्षात येते. प्रत्येक व्यक्तीला घटनेच्या प्रक्रियेतून जावं लागत असतं घडण्याची प्रक्रिया जितकी कठीण अवघड वाटते त्यातून एकदा का घडलं की लक्षात येतं की घटना किती महत्त्वाचं असतं. हे घडणं प्रत्येकाच्या वाट्याला यावं. बिगडता कधीही येत असतं घडता यायला हवं.
आत्मभान जगण्याचं !
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!