मैत्री असते तोपर्यंत ती दोघेही दिलखुलास असतात.. असं का ??
लालचंद कुंवर
उरुळी कांचन, पुणे
तो अणि ती , अगदी शालेय जीवनापासून एकमेकांचे चांगले मित्र असतात. अगदी दिलखुलासपणे एकमेकांशी बोलणार. एकत्र आलेत की कसलीही पोटातली गोष्ट असो . हमखास ती एकमेकांच्या ओठावर येणार. …. !
अगदी तीला काही दुखलं खुपल तर, त्या संवेदना त्याच्या पर्यंत जाऊन पोहचणार. अणि त्याला काही झाल तर , त्या वेदनेची कळ तिच्या पर्यंत जाऊन धडकणार. एवढंच नव्हे तर , तीच्या घरी कसलाही कार्यक्रम निघू दया… ! बस ! एक बेस्ट बडी म्हणून सगळ्या कार्यक्रमाची धुरा याच्याच खांदयावर. अगदी स्टार्ट टू एंड , त्याचीच लगबग.
अणि त्याच घरी काही सण, उत्सव असू द्या. सगळ्यात आधी नटून थटून , या लाडाबाईचाच थाटमाट.,जणू काही माझ्याच घरचा कार्यक्रम.
अगदी तोऱ्यातच घरभर वावरण ! अशी ही दिलखुलास , मनमोकळी आधारवड ठरणारी मैत्री .
अगदी त्याच अणि तीच , कसलही काम असो,
एकमेकांना विचारल्याशिवाय पानही नाही हलणार… !
काही खरेदी जरी करायची म्हटली, तरी आवर्जून एकमेकांना विचारल्याशिवाय वस्तू एकमेकांच्या घरात येणारच नाही. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या चांगल्या आणि वाईट परिस्थितीत, एकमेकांना भावनिक आधार देऊन मी तुझ्याबरोबर आहे, या भावनेची आपल्या आचार विचारातून सतत जाणीव करुन देत राहणं , हे अगदी अंगवळणीच पडलेल.
इतकी तो अणि ती यांची भावनिक attachment .. !
किंबहुना दोन तीन दिवस भेटणं नाही झालं …. ! बोलणं नाही झालं… ! तरी त्याच्या अणि तिच्या मनात अनामिक हुरहुर लागुन रह्यायाची.
कधीतरी विकेंडला तर मस्तपैकी भटकंती व्ह्यायची.
भान हरपल्या सारख्या दिवसभर गप्पा रंगायच्यात.
खरं तरं कुणालाही हेवा वाटावा असा निस्सीम मैतरचा अमूल्य दगिनाच… !
अशी ही,
अगदी शोले चित्रपटातल्या गीताप्रमाणे,
“ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे
तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे,”
अशी त्यांची नितळ मैत्री .. !
पण का कुणास ठाउक …… !
जोपर्यंत त्याची आणि तिची मैत्री असते ,
तोपर्यंत ते मनमोकळे अणि दिलखुलास असतात.
पण एकदा का कायट्याचा नायटा झाला
की बस !
त्याला एखादं शुल्लक कारण ही निमीत्तमात्र ठरु शकत… !
अणि ज्या मैत्रीचा हेवा वाटावा अशी ही मैत्री अगदी
एखादया पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे, एका क्षणात डळमळीत
होते.
अणि असच तो अणि ती च्या बाबतीत घडलं.
असं का व्हावं ?
कारण
तो अणि ती ,
आता एकमेकांना प्रत्येक गोष्टीत इतके गृहीत धरायला लागतात .
त्यांना याचं ही भान राहिलं नव्हतं की ,
प्रत्येक व्यक्ती हि एकमेकांपेक्षा वेगळी असते.
आवडीनिवडी भिन्न असतात.
कितीहीं जिवाभावाची मैत्री असो ,
एकमेकांची स्पेस जर एकमेकांना मिळाली नाही तर ते नातं दिलखुलास न होता , सरदर्द ठरत .
कालांतराने त्या नात्याच ओझ वाटू लागतं.
अणि मैत्रितला सहज अणि मोकळेपणा अलगदपणे निघून जातो
नात कोणतंही असो.. ! कितीही जिवाभावाच असो… !
दोन व्यक्तींमधल वेगळपण याचा respect अणि accept नाही केल तर…. ,
disheart होऊन त्या नात्याचा शेवट हा ठरलेला असतो.
अणि तेच तो अणि ती , यांच्या दिलखुलास मैत्रीच्या बाबतीतही असच झालं.
म्हणून आपल्याही मैत्रीच्या नात्यांचा तो अणि ती होऊ द्यायायचा नसेल तर काही तत्वे ही पाळावीच लागतील.
Give respect , Take respect .
Don’t interfere .
Be honest.
Give space.
समाप्त.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!