Skip to content
Home » जिवंत राहायचंय तर बदलायलाच हवं!!!

जिवंत राहायचंय तर बदलायलाच हवं!!!

जिवंत राहायचंय तर बदलायलाच हवं!


शिवाजी भोसले I 9689964143


माणसाच्या हातात असलेलं ‘मोबाईल’ नावाचं छोटंसं यंत्र प्रचंड मोठ्या बदलाचं कारण ठरलं आहे. एकूणच माणसांचं जगणंच ‘ग्लोबल’ होऊन बसलं आहे. माणसानं वेळीच सावध होऊन वर्तमानातच बदल घडवणे आवश्यक असतं. जी माणसं वर्तमानात बदल घडतात, तीच माणसं भविष्यकाळात सुद्धा बदल घडू शकतात.

वर्तमानात बदल न घडवणारी माणसं भविष्य काळ अंधारात काढत असतात, हे शाश्वत सत्य आपल्याला केव्हाच नाकारता येणार नाही. माणसांना बदलावर विश्वास ठेव बदलत्या जगासोबत आणि युग, तंत्रज्ञानासोबत स्वतः सुद्धा बदलावं लागत असतं, हाही एक बदलाचा नियम आहे. बदलाच्या नियमांना माणसाला कधीच टाळून चालता येणार नाही. जिवंत राहायचं, जगायचंय तर बदलास स्वीकारावाचं लागतं. बदलास स्वीकारलं नाही तर स्वतःला इतिहासात जमा व्हावं लागतं,

कधी नव्हे इतके बदल सध्याच्या काळात घडत आहेत. दिवसेंदिवस जग झपाट्याने बदलत चाललं असून क्षणाक्षणाला प्रचंड मोठे बदल घडत आहेत. अवघ्या ‘एका क्लिक’वर संपूर्ण जग माणसाच्या मुठीत सामावलय. क्षणात जगातील सर्व माहिती माणसाला पाहिजे तिथे, पाहिजे तशा स्वरूपात मिळते. माणसाच्या हातात असलेलं ‘मोबाईल’ नावाचं छोटंसं यंत्र प्रचंड मोठ्या बदलाचं कारण ठरलं आहे. एकूणच माणसांचं जगणंच ‘ग्लोबल’ होऊन बसलं आहे.

एकीकडे जग झपाट्याने बदलत चालले तर दुसरीकडे काही माणसं आहे, त्याच ठिकाणी आहेत. त्यांना कुठल्याही स्वरूपाचे बदल नकोय, जसं सुरू आहे तसंच सुरू राहावं, अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ ही त्यांची मनोधारणा बनली आहे. पुढचे पुढे पाहून घेऊ, असे म्हणत वेळ काढून नेण्याची त्यांची सवय त्यांना कुठेतरी गोत्याचा आणत असते. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा प्रत्यक्ष संकटांचा सामना करावा लागतो.

त्यामुळे माणसानं वेळीच सावध होऊन वर्तमानातच बदल घडवणे आवश्यक असतं. जी माणसं वर्तमानात बदल घडतात, तीच माणसं भविष्यकाळात सुद्धा बदल घडू शकतात. वर्तमानात बदल न घडवणारी माणसं भविष्य काळ अंधारात काढत असतात, हे शाश्वत सत्य आपल्याला केव्हाच नाकारता येणार नाही.

बदल हा सृष्टीचा नियम असून माणूस हा परिवर्तन व प्रगतशील प्राणी आहे. त्यामुळे तो बदल स्वीकारतच असतो. मानवाचे आचार, विचार, वर्तणूक, वागणूक, संस्कृती, भाषा पद्धत सर्व काही बदलत असतं. आणि त्यातूनच माणूस अधिक समृद्ध होत जात असतो. काही बदल झपाट्याने होतात तर काही बदल हळूहळू होतात.

बदल घडण्यासाठी व घडविण्यासाठी विशिष्ट असा टप्पा जाऊ द्यावा लागत असतो, त्यानंतरच कुठे बदलाचं रूप आणि स्वरूप पाहायला मिळतं. मात्र अनेक वेळा जगातील घडणार्‍या घटनांचं, घडामोडींचं आकलन न झाल्यामुळे व परिस्थिती, वास्तवाचं भान न आल्यामुळे माणसाला बदल स्वीकारणे अवघड होऊन जातं. बदल हे स्वीकारावेच लागत असतात त्यांना नाकारून कधी चालता येत नसतं. माणसांना बदलावर विश्वास ठेव बदलत्या जगासोबत आणि युग, तंत्रज्ञानासोबत स्वतः सुद्धा बदलावं लागत असतं, हाही एक बदलाचा नियम आहे.

बदलाच्या नियमांना माणसाला कधीच टाळून चालता येणार नाही. स्वतः, कुटुंब, घरदार, राज्य व राष्ट्र बदलायचं असेल तर कुठेतरी बदलास, परिवर्तन व तंत्रज्ञाना स्वीकारावं लागणार आहे. तेव्हाच कुठे प्रगतीचा आणि यशाचा मार्ग सापडू शकतो. अन्यथा बदल न स्वीकारता येणारी माणसं इतिहास जमा होत असतात, अशी कित्येक शेकडो उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील.

निसर्गाच्या आणि बदलाच्या नियमांना न स्वीकारणारी माणसं आजवर कधीच मोठी होऊ शकली नाही. जिवंत राहायचं, जगायचंय तर बदलास स्वीकारावाचं लागतं. बदलास स्वीकारलं नाही तर स्वतःला इतिहासात जमा व्हावं लागतं, आणि इतिहासात जमा न होता इतिहासात अजरामर होण्यासाठी बदलास स्विकारुन नव्याने काहीतरी उभं करावं लागत असतं. आज आहे त्यापेक्षा काहीतरी उदात्त, उन्नत व सकारात्मक करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू ठेवावा लागत असतो.

यातूनच माणसाच्या जगण्याची व जीवनाची परिभाषा सुद्धा बदलत असते. माणसांच्या जीवनात बदल असेल तर सर्व काही नाविन्यपूर्ण उभारलेलं असतं. आणि बदल न स्वीकारल्यास विशिष्ट वेळेनंतर सर्वकाही संपलेलं असतं. ते पुन्हा कधीच नव्याने उभं करता येत नाही. नव्याने काहीतरी उभं करायचं असलं तर डोक्यात परिवर्तनाच्या विचारातून बदलांचं आव्हान स्वीकारणं गरजेचं आहे.

एकेकाळी जगातील सर्वात मोठी सायकल उत्पादक कंपनी म्हणून अभिमानाने मिळविणाऱ्या ‘ॲटलास सायकल’ आज डोळ्याने पाहायला सुद्धा उरलेली नाही. आजच्या तारुण्यकडे वळणाऱ्या पिढीला ॲटलास सायकलचं नाव सुद्धा माहिती नसावं, इतकी शोकांतिका आहे. कंपनीकडे कच्चा मला खरेदी करण्यासाठी पैसेच न उरल्यामुळे त्यांना उत्पादनसुद्धा थांबावं लागला आहे.

कालानुरूप योग्य बदल न केल्याने ॲटलासवर ही वेळ आली आहे. असाच काहीसा प्रकार नोकिया, सॅमसंग, याहू बाबतही घडला आहे. याहूने गुगल नाकारलं होतं. आजच्या स्थितीत गुगलची आणि याहूची काय स्थिती आहे? हे सर्वांनाच माहिती आहे. असे कितीतरी उदाहरणे देता येतील. मोबाईल तंत्रज्ञानाच्या युगात प्रचंड मोठे बदल घडताना नवनवीन फीचर्स, तंत्रज्ञान, प्रणाली अद्यावत होत असताना नोकिया, सॅमसंगने अँड्रॉईड नाकारले, आपल्या कार्यप्रणाली व शैलीत कोणतेही बदल घडवून आणले नसल्याने त्यांच्यावर इतिहास जमा होण्याची वेळ आली आहे.

‘अँड्रॉइड’ ही तरुण पिढीची मागणी असताना नोकिया, सॅमसंग यासारख्या कित्येक मोबाईल उत्पादक कंपन्यानी अँड्रॉइडचा पुरवठा न केल्याने त्यांच्या मोबाईलची मागणीसुद्धा घटली. पर्यायाने आहे ते मोबाईल सुद्धा नागरिक विकत घेत नसल्याने कंपनीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. कंपनीचे प्रचंड मोठे नुकसान झाल्यानंतर व नामशेष होण्याची वेळ आल्यानंतर त्यांनी पुन्हा अँड्रॉइडचा अविष्कार करण्याचा विचार मनात आणला आणि मोबाईलमध्ये नवे तंत्रज्ञान अवगत करणे सुरू केले. तेव्हा कुठे या कंपन्यांना नव्याने ओळख मिळू लागली आहे.

जोपर्यंत बदलायचा, परिवर्तनाचा कुठलाही विचार माणसाच्या मनात येत नाही, तोपर्यंत बदलही घडत नसत. एकदा का बदलायचं ठरविलं तर बदलसुद्धा आपोआप बदलायला लागतो. आपलं कुठेतरी चुकतेय ? आता बदलायलाच हवं हा विचार माणसाला परिवर्तनाकडे घेऊन जात असतो. परिवर्तन घडलं की नाविन्य निर्माण व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे परिवर्तनाच्या वाटेवरून जाण्यासाठी बदलण्याची वाट न पाहता स्वतःबदल घडवावे लागणार आहे.

कुणीतरी यावं आणि माझ्या जीवनाचा उद्धार करावा, असं कुणाला वाटत असलं तर ते केवळ एक स्वप्नच ठरू शकतं. स्वतः शिवाय इतर कोणीही तुमच्या जीवनाचा उद्धार करू शकत नाही. आणि आजवर कोणीही इतरांचा उद्धार केलेला नाही. स्वतःचा उद्धार, कल्याण स्वतःलाच करावं लागत असतं. इतरांचं केवळ मार्गदर्शन, सहकार्य आपुलकी व प्रेम मिळत असतं. स्वतःच्या हिताचे निर्णय स्वतः घेत जीवनाचा प्रवासवरून मार्गक्रमण व्हावं. हाच खरा सृष्टीचा नियम आहे.

ओल्ड इज गोल्ड असं कधी काहीतरी म्हटलं जात होतं. पण आता न्यू इज डायमंड म्हणण्याची वेळ आली आहे. जुनं ते सोनं असतंच, पण नवं आता डायमंड झालं आहे. आयुष्यात जुने ते कायम ठेवावाच पण त्यासोबत नव्याचा स्वीकार करावा. त्यासाठी सातत्याने नवं काहीतरी शिकत राहावं. जीवनात नाविन्य आणत राहावं. बदलत्या काळासोबत माणसांनी सुद्धा बदलत राहावं. कारण जगायचं असलं तर बदलायलाच हवं असतं, हे कधीच विसरून चालता येणार नाही.

पावलापावलावर व क्षणाक्षणाला झालेले बदल आत्मसात करत नाविन्याच्या विचारांना जगाला कवेत घेण्यासाठी स्वतःच्या पंखात बळ पेरावं लागतं. स्वतःच्या हिमतीवर जगात सर्वांना आपलंसं करावं लागतं. बदलांना स्वीकारून विचार परिवर्तनाचं, बदलत्या संस्कृतीचं आणि आणि आकाशात झेप घेण्याचं सामर्थ्य स्वतःला सिद्ध करावं लागतं. तेव्हाच कुठे जगही तुम्हाला जवळ करत असतं. जग आणि माणसांचा जवळ होणं म्हणजे नव्या क्रांतीचे बीज पेरणी असतं. हे बीज प्रत्येकाच्या हदय जमिनीवर करता यायला हवं. तेव्हा बदलायचं आणि जगातला कवेत घ्यायचं हे सहज सोपे होऊन जातं.

आत्मभान जगण्याचं !



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “जिवंत राहायचंय तर बदलायलाच हवं!!!”

Leave a Reply

error: Content is protected !!